लखमापूर ग्रामपंचायतीतर्फे 11 जून 2023 रोजी भव्य शेतकरी मेळावा

 लखमापूर ग्रामपंचायतीतर्फे 11 जून 2023 रोजी भव्य शेतकरी मेळावा

लातूर-रेणापूर तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायतीतर्फे 11 जून 2023 रोजी सकाळी 08.00 वा.  भव्य अशा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी या भागातील आदर्श शेतकरी भास्करराव खाडप हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची उपस्थिती राहणार आहे. या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून देशातील प्रसिध्द हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हा कृषी अधिक्षक रक्षा शिंदे, रेणापूरच्या तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड, लातूरचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
रेणापूर तालुक्यातील लखमापूर येथील या शेतकरी मेळाव्याला लखमापूर गाव व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून शेतकरी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन लखमापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्याताई रमेशराव खाडप, ॲड.रमेश खाडप, उपसरपंच उमेश धायगुडे, लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रा.राजेसाहेब खाडप यांच्यासह ग्रामस्थांनी केलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم