श्री रामनाथ विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा 99 टक्के निकाल

 श्री रामनाथ विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा 99 टक्के निकाल
 आलमला/ प्रतिनिधी - श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला तालुका औसा या विद्यालयाचा मार्च 2023 मध्ये झालेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.00 टक्के इतका लागला असून विद्यालयातून प्रथम कु.मुलानी तनाज मुक्रम 92.60, द्वितीय कु.लोणारे स्नेहा महादेव 92.20 व तृतीय कु.पांचाळ स्नेहा माधव 91.40 गुणानुक्रमे या तीन मुली प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने यश मिळवले आहे. विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विशेष प्राविण्यात 25 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 34 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  99 % निकाल विद्यालयाने दिला आहे .या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्रीं,आंबुलगे रंगनाथ,  धाराशिवे शरण, पंडगे नरसिंग, नलवाडे नितीश, श्याम कोकाटे, सौ अमरजा उकरडे यांचा व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष ऍड उमाशंकर एस पाटील ,उपाध्यक्ष शिवाजीराव आंबुलगे ,सचिव प्रभाकर कापसे, सहसचिव नंदकुमार धाराशिवे संस्थेचे ,विश्वस्त प्राध्यापक जी एम धाराशिवे , सोपानकाका अलमलेकर मन्मथप्पा धाराशिवे, विरनाथ हुरदळे, शिवसांब हुरदळे, नरेंद्र पाटील ,मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील , पर्यवेक्षक श्री पी सी पाटील संस्थेच्या सभासदांनी व  ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे .

Post a Comment

أحدث أقدم