तृप्ती अंबुलगे हिचे शालांत परीक्षेत उज्वल यश

तृप्ती अंबुलगे हिचे शालांत परीक्षेत उज्वल यश

    औसा/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 2023 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये श्री.वीरभद्रेश्वर प्रशालेची विद्यार्थिनी कु. तृप्ती अंबुलगे हिने 93.80% गुण संपादन करून उज्वल यश प्राप्त केले आहे.यापूर्वी राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये निवड सिद्ध करून तृप्ती अंबुलगे या विद्यार्थिनीने आपली पात्रता यापूर्वीच शाहु प्रवेशासाठी सिद्ध केलेली आहे.
       तिच्या या यशाबद्दल श्री.वीरभद्रेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ इळेकर, चंद्रकांत तोडलगे,युवराज हलकुडे, मुख्याध्यापक शिवकुमार मुर्गे,सहशिक्षक एस.एम. कांबळे,चंद्रशेखर हलमडगे,वैद्य सर,सौ. कारंजे, कांबळे मॅडम,होडलगे मॅडम,मुर्गे मॅडम, राम कांबळे, विकास कांबळे,नवनाथ बनसोडे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم