शब्दांकित साहित्यिक मंच लातूरचे कविसंमेलन यशस्वी संपन्न

शब्दांकित साहित्यिक मंच लातूरचे कविसंमेलन यशस्वी संपन्न
लातूर/प्रतिनिधी-शब्दांकित साहित्यिक मंच लातूरच्या वतिने आयोजित केलेले आॕनलाईन कविसंमेलन यशस्वी संपन्न झाले.
कविसंमेलनाचे अध्यक्षपद हैद्राबादचे जेष्ठ साहित्यिक देवा प्रसाद मयला यांनी भूषविले.
सुरुवातीला मंचाच्या अध्यक्षा प्रा.नयन राजमाने यांनी मंचाचा उद्देश आणि उद्देश्यपूर्तीच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला .
कविसंमेलनात निमंत्रित कवि/शायर *सुरेश गीर "सागर"* ,*गोविंद गारकर*, *विशाल अंधारे*, *शैलजा कारंडे*, *अॕड.रजनी गिरवलकर* आणि *प्रा.नयन राजमाने* सर्व *लातूर*
*देवा प्रसाद मयला*, *सीताराम माने*, *डाॕ.कुमुद बाला*, *मोहिनी गुप्ता* व * *शिल्पी भटनागर* सर्व *हैद्राबाद*
यांनी संस्मरणीय सहभाग नोंदविला.
सुत्रसंचालन करताना *अॕड.रजनी गिरवलकर* यांनी प्रत्येक कविंचा संक्षिप्त परिचय देत-देत,आपली कविता/गझल सादर करण्यास काव्यमय शब्दभावाने पाचारण करुन कविसंमेलनास इन्द्रधनुष्यी रंगाने सुशोभित केले.
प्रथम कविसंमेलनाचे अध्यक्षपदी विराजमान होताना *देवा प्रसाद मयला* यांनी आपली एक सुंदर कविता ऐकवून सर्व कविंना उत्साहित केले.
तदनंतर 
कवयित्री *डाॕ.कुमुद बाला* यांनी कविसंमेलनाची ज्योत प्रज्वलित करताना आपली रचना *शब्दों का खेल* रंगवला व दुसरी कविता *अमराई* ने आंब्याच्या बनाचा अनुभव दिला.
*मोहिनी गुप्ता* ने आपली सुंदर कविता गोड आवाजात सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली.
*शिल्पी भटनागर* च्या *माँझे से लफ्ज* या कवितेने श्रोत्यास मंत्रमुग्ध केले.
*शैलजा कारंडे* यांच्या छोट्या कवितेने कमी शब्दात मोठा आशय कसा भरायचा हे शिकविले .
*प्रा.नयन राजमाने* यांच्या *लेखा जोखा* या कवितेने महिलाने सुरक्षित राहून हिम्मतीने जगणे शक्य असल्याचा जणू मंत्रच दिला .
सुत्रसंचालक *अॕड.रजनी गिरवलकर* यांनी कविता *हार* आणि *मेरा भारत* सादर करुन श्रोत्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागवले.
कवि-शायर *सुरेश गीर "सागर"* यांनी एक गझल पत्नीवर तर दुसरी बेताल वक्तव्याचे परिणाम यावर सादर केली.
*सीताराम माने* यांनी आपल्या तोंडपाठ कविता *इन्सानियत मर चुकी* आणि *क्या हिन्दू क्या मुसलमान* खड्या आवाजात ऐकवून आपल्या स्पष्ट विचारसरणीचा परिचय दिला.
*गोविंद गारकर* च्या *रख हिम्मत लड़ने की* या कवितेने महिलाना हिम्मतीने जगण्यासाठी मार्गदर्शन केले.
*विशाल अंधारे* ची कविता *बुध्द की तरह तराश* व *बाजारवाली गली* ने श्रोत्यांवर परिणामकारक प्रभाव टाकला.
शेवटी अध्यक्षशीय वक्तव्य देताना *देवा प्रसाद मयला* यांनी सहभागी कविंच्या कवितांचे कौतुक करुन आपली रचना *आवश्यकता है वन की* सादर करुन *निसर्गाला वाचवा* असे जणू आवाहनच केले.
आणि  प्रा.नयन राजमाने सर्व कविंचे मनःपूर्वक आभार मानून कविसंमेलन यशस्वी संपन्न झाल्याचा आनंद व्यक्त करुन अध्यक्ष्याच्या परवानगीने कविसंमेलन संपन्न झाल्याची घोषणा केली.

Post a Comment

أحدث أقدم