‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण
खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची उपस्थिती

लातूर : शासनाच्या विविध योजनांची माहिती, लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक लाभाच्या योजनांचे मंजुरी आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘दिशा’ समिती बैठकीपूर्वी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रकल्प उमेद अंतर्गत जिल्ह्यातील 350 बचत गटांना 9 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून याचे मंजुरी आदेश बचत गटांच्या महिलांना यावेळी वितरीत करण्यात आले. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना वैयक्तिक विहीर, जनावरांचा गोठा आदी बाबींचे मंजुरी आदेश, तसेच ग्रामीण रस्ते मंजुरी आदेश, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अभिसरण अंतर्गत पूर्ण कामांचे प्रमाणपत्रे यावेळी खासदार श्री. शृंगारे आणि आमदार श्री. पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم