रुग्णांच्याच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावावी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन

 रुग्णांच्याच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावावी    अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी   जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन 


     लातूर/प्रतिनिधी: मानवी हक्क आयोगाने द चार्टर ऑफ पेशंट राइट्स अर्थात रुग्णांच्या हक्काची सनद प्रसिद्ध केली असून केंद्र सरकारने ती स्वीकारली आहे.ही सनद जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात दर्शनी भागात लावावी,अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
    ही सनद प्रत्येक रुग्णालयात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिलेले आहेत.परंतु ती कोठेही लावलेली दिसत नाही. पुरेशी माहिती मिळवण्याचा हक्क,आजाराचा प्रकार,कारणे, तपासण्यांची तपशील,उपचाराचे परिणाम,अपेक्षित खर्च,सविस्तर बिले मिळवण्याचा हक्क,दुसऱ्या डॉक्टरचे मत घेणे, उपचारादरम्यान गोपनीयता,पुरुष डॉक्टर कडून महिला रुग्णाची तपासणी होत असताना स्त्री कर्मचारी वा नातेवाईक सोबत असण्याचा हक्क हे रुग्ण हक्क सनदमध्ये असणे अपेक्षित आहे. रुग्णाला उपचाराचे दरपत्रक पाहता न आल्यास किंवा रुग्णालय प्रशासनाकडून त्रास होत असल्यास तक्रार करता येते. परंतु ही सनद रुग्णालयात लावलेली दिसत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना ही सनद लावणे बंधनकारक करावे,अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय  मिरकले पाटील यांनी केली आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष इस्माईल शेख,मंजुश्री ढेपे पाटील,कौशल्या मंदाडे,सारिका मसलकर,शारदा बेद्रे,वैशाली शिंदे यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم