वैभव चांदे यांनी महाड -पोलादपूर कृषीउत्पन्न बाजार समिती सक्षम करावी - सुरेश पाटील

 वैभव चांदे यांनी महाड -पोलादपूर कृषीउत्पन्न बाजार समिती सक्षम करावी - सुरेश पाटील

 

वैभव चांदे यांची तरुण वयात बोरावळे ग्रुपग्रामपंचायत सरपंच ते महाड -पोलादपूर कृषीउत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ही वाटचाल पोलादपूर वासियांना आत्मीयतेची वाटते आहेत्यांना मिळालेले हे पद  म्हणजे तालुक्यातील तरुणांना रोजगारांच्या संधी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला घामाचे अधिकचे पैसे देणारी ठरो असे उदगार मुंबईतील शिवसेना विभागप्रमुख आणि नगरसेवक सुरेश पाटील यांनी घाटकोपर येथे काढलेमहाड -पोलादपूर कृषीउत्पन्न बाजार समितीचे उपसभापती या पदावर वैभव चांदे यांची नुकतीच नियुक्ती झाली त्याबद्दल श्री गावदेवी युवक संघटनेच्या वतीने त्यांचा हृद्य सत्कार आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी पाटील बोलत होतेकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे हे होतेते आपल्या भाषणात म्हणाले कीवैभव चांदे हे आपले वडील भाई स्व.दिनकर चांदे यांचा राजकीय वारसा चालवत असले तरीवाडीवस्त्यांवर शेकापच्या माध्यमातून कामे करताना ते राजकीय स्वार्थ  साधता सामाजिक दृष्टीकोनातून विकासकामे करीत आहेतत्यांच्या कामाची पोचपावती म्हणूनच आज पक्षभेद विसरून त्यांच्या सत्काराला आज ही गर्दी एकवटली आहे.  वैभव यांचे वय पहाता ते अशा वळणावर उभे आहेत कीत्यांनी कुठे जायचेका जायचेकसे जायचेकिती स्पीडने जायचे आणि कोणते ध्येय गाठायचे आहे हे ठरविण्याचे ही वेळ आणि वय आहेयापुढची राजकीय कारकीर्द घडवताना त्यांना मेहनत घ्यावी लागेलकाही काळासाठी उसनवारीने पुढे चालावे लागेलवेळप्रसंगी दुसऱ्याची कॉपी केलीदुसऱ्याच्या काही गोष्टी हिसकावून घेतल्या तरी चालतीलपण दुसऱ्याची वाट घेऊन चालू नयेनाहीतर तो ज्या चुकीच्या ठिकाणी पोहोचला आहे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पश्चातापाची वेळ येईलज्येष्ठ सामाजिक नेते आणि शिवसेना घाटकोपर विधानसभा प्रमुख सुभाष पवाररानवडी गावचे पोलीस पाटील पांडुरंग जाधवमनसेनेते राज पार्टेलक्ष्मण मोरेज्ञानेश्वर खेडेकरनिलेश कोळस्करयांचीही यावेळी वैभव चांदे यांच्या कारकिर्दीचा आढवा घेणारी भाषणे झालीपोलादपूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन अजित कंकयुवासेना विभागधिकारी अभिषेक मोरेयुवराज साळेकरराम गुडेकर,  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच निवृत्ती उतेकरयांनी केलेतर आभार प्रदर्शन विनीत चांदे यांनी केले.

बोरावळे मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय पार्टे आणि सचिव सुभाष उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक  सोपान जाधवमहादेव सकपाळसुभाष महाबदीराजू उतेकरदगडू महाबदीरामा पार्टेपांडुरंग मोरेरामचंद्र मोरेशिवाजी कळंबेदाजी महाबदीमंगेश कळंबेभानुदास चांदेनितेश पवारनरेश सकपाळश्रीधर मोरेसुशांत चांदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Post a Comment

أحدث أقدم