लिकिंग विरहित रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा करा -संतोष सोमवंशी

लिकिंग विरहित रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा करा -संतोष सोमवंशी
लातूर / प्रतिनिधी : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना लिकिंग विरहित रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा करावा. तसेच मिश्र खते विक्री बंद करण्यात यावी, अन्यथा  आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लातूर शिवसेना मा. जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेनाद्वारे दिले आहे.
    लातूर जिल्ह्यात खरीप व रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी असते . या वर्षाच्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा होण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या आहेत. शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या डीएपी, 10:26:26 ,12:32:16 ,एमओपी या मुख्य खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.त्याचाच गैरफायदा घेत रासायनिक खत कंपन्या व घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेते यांच्या संगनमताने मागणी असलेल्या मुख्य रासायनिक खतासोबत शेतकऱ्याकडून मागणी नसलेल्या नॅनो युरिया, कंपोस्ट, मायक्रोन्यूट्रियंट, वाटर सोलूबल खते, गंधक तसेच दुसऱ्या रासायनिक खतांचे मुख्य खतासोबत लिंकिंग करण्यात येत आहे.
 यामुळे मागणी नसलेला माल शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. अगोदरच रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे. त्यातच लिंकिंगच्या मालाचा आर्थिक बोजा सामान्य शेतकऱ्यांना पेलवणारा नाही.

Post a Comment

أحدث أقدم