लातुरात प्रथमच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टरांचे यश


लातुरात प्रथमच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टरांचे यश  

   लातूर/प्रतिनिधी:लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात बाल हृदयरोग तज्ञ डॉ.नितीन येळीकर, डॉ.प्रशांत पाटील,बाल हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ.सारंग गायकवाड यांच्या टीमने बालकांच्या हृदयातील  झडपा(वॉल) बदलणे,ओपन हार्ट सर्जरी यासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.यात  झडपा न बदलता केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया लातुरात प्रथमच झाल्या.
  अवघ्या तीन दिवसांत बाल हृदयविकाराच्या १३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.बाल हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ.सारंग गायकवाड यांच्या टीमने गुंतागुंतीच्या सहा ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पाडल्या.ओपन हार्ट सर्जरी झालेले सर्व रुग्ण चार ते पाच दिवस उपचार घेवून घरी गेले.विशेष म्हणजे यातील दोन रुग्णांच्या हृदयामधील झडपा खराब झाल्या होत्या.त्यांच्यावर डॉ.सारंग गायकवाड यांनी झडप न बदलता केलेल्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. 
     बाल हृदयरोग तज्ञ डॉ.नितीन येळीकर,डॉ.प्रशांत पाटील यांच्या टीमने बिनटाक्याच्या ७ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या.विशेष म्हणजे सर्व रुग्ण शस्त्रक्रियेनंतर २४ तासाच्या आत घरी पाठवण्यात आले. 
   लहान मुलांतील हृदय विकारावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे  नियमितपणे,येथे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. विवेकानंद रुग्णालयात एकाच छताखाली सर्व आजारांवर उपचाराची व्यवस्था असल्याने आणि विविध शासकीय योजना उपलब्ध असल्याने  दूरवरून येणाऱ्या रुग्णांचा ओढा असतो.
  विवेकानंद रुग्णालयातील हृदयरोग तज्ञासोबतच अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ.सी.के.औरंगाबादकर,बालरोगतज्ञ डॉ.प्रमोद तोष्णीवाल,हृदयविकार भूलतज्ञ डॉ.प्रवीण लोव्हाळे,भूलतज्ञ डॉ.आरती झंवर,डॉ. अश्विनी जाधव,समन्वयक सुचेता महिंद्रकर,श्रीपाद कुलकर्णी,प्रिया शेट्टी यांच्यासह  नेताजी भोईबार,  दत्ता पळसे,सोमनाथ कोकणे, विकास जनमले,शाम बिरादार, संदीप पाटील,दत्ता जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले,अशी माहिती  रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राधेश्याम कुलकर्णी यांनी दिली.
    या यशाबद्दल विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर,मार्गदर्शक डॉ.अशोकराव कुकडे काका,
डॉ.गोपीकिशन भराडिया, डॉ.सौ.अरुणा देवधर,डॉ.
ब्रिजमोहन झंवर,डॉ.गौरी कुलकर्णी यांनी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم