औसा विधानसभा निवडणूक प्रमुखपदी संतोष मुक्ता यांची निवड

औसा विधानसभा निवडणूक प्रमुखपदी संतोष मुक्ता यांची निवड 
औसा/प्रतिनिधी- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औसा विधानसभा निवडणूक प्रमुखपदी भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष अप्पा मुक्ता यांची नियुक्ती केली आहे. पक्षाची संघटनात्मक मजबूत बांधणी करण्यासाठी संतोष मुक्ता यांनी केलेल्या कामाची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली आहे. संतोष मुक्ता यांनी औसा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलत आ. अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य केले आहे. औसा विधानसभा मतदारसंघात गाव तिथे भारतीय जनता पक्षाची शाखा तसेच नवतरुणांची मोठी फळी उभी केली आहे. या निवडीबद्दल संतोष मुक्ता यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शाहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.अभिमन्यू पवार यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم