‘नली’या बहुचर्चीत नाटकाचा उद्या लातूरकरांसाठी विनामुल्य प्रयोग

‘नली’या बहुचर्चीत नाटकाचा उद्या लातूरकरांसाठी विनामुल्य प्रयोग

लातूर : प्रतिनिधी-महाराष्ट्र इतर राज्यातील नाट्यरसिकांनी गौरविलेले ‘नली’ हे बहुचर्चीत एकलनाट्य लातूरच्या प्रगल्भ प्रेक्षकांसाठी लातूरच्या ‘कलासक्त’ मंडळींनी आयोजित केले असून उद्या दि़ १६ जून रोजी रात्री ८ वाजता येथील कन्हेरी रोडवरील श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या रंगमंचावर आविष्कारीत होणार आहे़ सदर नाट्यप्रयोग लातूरकरांसाठी विनामुल्य आहे़
परिवर्तन जळगाव या नाट्यसंस्थेची निर्मिती असलेले हे नाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या साहित्यकृतीवर आधारीत असून गावगाड्यातील महिलांच्या कोेंडमाºयाचे भेदक चित्रण यात आहे़ स्त्रियांच्या प्रश्नांना चहुबाजुंनी भिडणाºया या नाटकाची संहिता शंभू पाटील यांची तर दिग्दर्शन योगेश पाटील यांचे असून हे अंतर्मनाला भिडणारे नाट्य आपल्या विलक्षण अभिनयाने हर्षल पाटील यांनी जिवंत केले आहे़
महाराष्ट्र, गोवा, कर्नाअक, दिल्ली, अशा विविध ठिकाणी प्रशंसनीय ठरलेल्या या नाटकाचे आजवर ७० च्या जवळपास उल्लेखनिय प्रयोग झाले आहेत़ विशेष म्हणजे, नांदेड येथे शनिवारी होत असलेल्या या नाटकाच्या प्रयोगात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत आणि डॉ़ रंगनाथ पठारे उपस्थित राहणार आहेत़
आपल्या भागातील नाट्यरसिकांनी हे नाटक आवर्जुन पहावे, या उद्देशाने लताूरच्या नाट्यवर्तूळातील मंडळी पुढे आली आहे़ सादरीकरणाच्या एकुण खर्चासाठी लागणारा निधी  या मंडळींनी स्वच्छेने उभा केला आहे़ यानिमित्ताने या सर्व मंडळीची सांस्कृतिक एकजूट भविष्यातील चांगल्या नाट्यउपक्रामासाठी उपकारक ठरणार आहे़
लातूरच्या विविध क्षेत्राच्या चळवळीतील मंडळींनी, विशेषत: महिला वर्ग आणि महाविद्यालयीन युवावर्गाने मोठ्या संख्येने येऊन, या नाटकचा आस्वाद घ्यावा, त्याचबरोबर प्रयोगानंतर होणाºया कलावंतांशी सवांदात सहभागी व्हावे, असे आवाहन  कलासक्त, लातूरच्या मंडळींनी केले आहे़.

Post a Comment

أحدث أقدم