रिलायन्स लातूर पॅटर्न च्या विद्यार्थ्यांचे NEET - २०२३ परिक्षेत अभूतपूर्व यश.


रिलायन्स लातूर पॅटर्न च्या विद्यार्थ्यांचे NEET - २०२३ परिक्षेत अभूतपूर्व यश.

लातूर : श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा रिलायन्स लातूर पॅटर्न च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे NEET - २०२३ परिक्षेत घवघवीत यश संपादन करून किर्तीमान यश स्थापित केले. दि. १३ /०६/२०२३ रोजी NTA द्वारा NEET - २०२३ परिक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. नीट परिक्षा ७ मे २०२३ रोजी घेण्यात आली होती त्यात महाराष्ट्रातून २,७३,८१९ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली त्यात १,३१,००८ विद्यार्थी पात्र ठरले.

श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा रिलायन्स लातूर पॅटर्न मध्ये एकूण ४२३ विद्यार्थ्यांनी NEET  ची परिक्षा दिली यामध्ये चि. अर्थव घुले  या विद्यार्थ्यांने ६८१ गुण  घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच  कु. भूमी पाटील (६६५) व कु. पडघन प्रगती (६५६) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला. ६०० गुणापेक्षा पेक्षा जास्त २० विद्यार्थ्यांनी तर ५५० गुणापेक्षा जास्त ३८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

मूलतः सर्वसाधारण गुणवत्तेच्या मुलांमधून सुद्धा असाधारण निकाल देणारी संस्था म्हणून रिलायन्स लातूर पॅटर्न प्रचलित होत आहे. वेळ व शक्तीचा अपव्यय टाळत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सर्व सुविधा रिलायन्सने पुरविल्या. गुणवत्ता, सातत्य व सुरक्षितता या बाबींना महत्व देत रिलायन्स लातूर पॅटर्न निकालाधिष्टित संस्था म्हणून उत्तम कार्य करत आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. उमाकांत होनराव सर, संस्थेच्या सचिव, प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम तसेच विद्यार्थी, पालक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी धुमधडाक्यात निकाल साजरा केला.

 

Post a Comment

أحدث أقدم