भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणीला तुळजापूर तालुक्यात ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद

 भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणीला तुळजापूर तालुक्यात ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद 


तुळजापूर:- भारत राष्ट्र समिती चे प्रमुख तथा तेलंगणा राज्यायाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे प्रभारी आ. जीवन रेड्डी , शकंर अण्णा धोडंगे , मा. खासदार हरी भाऊ राठोड , मा. सुधीर बिदूं मा. हिमानुशी तिवारी,मा.माणिक कदम, मा. प्रशांत नवगिरे , थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील मुरटा, चिकुंद्रा , मारकुरी सह आजी बाजुच्या परिसरात भारत राष्ट्र समिती सदस्यत्व नोंदणी मोठ्या संख्येने करण्यात आली.

 प्रत्यक्ष शेतकरी, नागरिक, युवकांची भेट घेऊन "भारत राष्ट्र समिती" पक्षाचे ध्येय, धोरण, काम यांची सुनील चव्हाण व , अरविंद घोडके, सुरज बचाटे ,असीम जागीरदार नळदृग शहर कमिटी युवक लीडर , त्यांच्या टीमने माहिती दिली व पक्षाची सदस्य नोंदणी केली.

 यावेळी संध्या लाखे , रेखा लोंढे, रघुभाई लोंढे, करुणा गवळी, संगीता सुरवसे यांच्यासह त्यांच्या परिसरातील 60 महिलांनी पक्षाची सदस्य नोंदणी केली.यावेळी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक गावातील प्रमुख चौकात पक्षाचे झेंडे, बनर लावून "भारत राष्ट्र समितीचे " मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करण्यात आली पक्ष नोंदणीसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

أحدث أقدم