अजीम हायस्कूलच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

 अजीम हायस्कूलच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

औसा : प्रतिनिधी
औशातील अजीम हायस्कूलने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा ९१.५८ टक्के निकाल लागला. यात श्रेयस नलगे व परवेज शेख या दोघांनाही ९७.४० टक्के गुण घेवून सर्वप्रथम आले. तर प्राजक्ता बनसोडे ९७ टक्के घेवून द्वितीय, बेनझीर शारवले ९६.८० टक्के घेवून तिसरी आली आहे. ६५ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, तर ८७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. अफसर शेख, संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी, प्राचार्य निजामोद्दिन शेख, सुलेमान शेख, श्रीमती परवीन शेख, दानिश शेख, टी. एम. शेख, बी. सी. केसरे, डॉ. खलील सिध्दीकी, हाकीम सय्यद अदिनी सत्कार केला.

Post a Comment

أحدث أقدم