मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख बनले विस्तार अधिकारी

 मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख बनले विस्तार अधिकारी

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, प्राथमिक शिक्षक, सहशिक्षक अशा १६ जणांना समुपदेशन करून विस्तार अधिकारीपदी पदोन्नती दिली आहे तर अराजपत्रीत मुख्याध्यापक वर्ग ३ या पदावर समुपदेशन करून ३ शिक्षकांना पदोन्नत्ती देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, प्राथमिक शिक्षक, सहशिक्षक या पदावरील २७ शिक्षक हे पदोन्नतीने विस्तार अधिकारी पदासाठी पात्र झाले होते मात्र कालवयोमानानुसार १० पात्र लाभार्थी सेवानिवृत्त झाले. १६ विस्तार अधिकारी पदांच्या जागेसाठी शनिवारी लातूर जिल्हा परिषदेत डा.ॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती सभागृहात समुपदेशन पार पडले.यात गणेश दाडगे, उमाकांत जाधव, ज्ञानोबा भिकाने, विनायक भिंगोले, व्यंकट गंगणे, बालाजी बावचे, मोतुलाल शारवाले, मन्नान शेख, अच्युत राजहंस, सुरेश मोरे, अशोक श्रृंगारे, नसरोद्दिन शेख, नारायण तिगोटे, भिवाजी पवार, शिवशंकर पाटील, शिरीषकुमार रोडगे यांना जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ विस्तार अधिकारी शिक्षण कनिष्ठ या पदावर समुपदेशनाने पदोन्नती देण्यात आली

आहे.राजकुमार गड्डीमे, बालाजी बिराजदार, शंकर कल्याणी यांना जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ अराजपत्रीत मुख्याध्यापक या पदावर समुपदेशन करून पदोन्नत्ती देण्यात आली आहे. या समुपदेशन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, अधीक्षक मधुकर वाघमारे, सहायक प्रशासन अधिकारी हिरागिर गिरी, विस्तार अधिकारी संजय पारसेवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم