लातूर जिल्हयात काँग्रेस पक्षाचे विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभारी जाहीर

 आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानीक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारीसाठी

 लातूर जिल्हयात काँग्रेस पक्षाचे विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभारी जाहीर

 लातूर/प्रतिनिधी : आगामी काळात होऊ घातलेल्या लातूर जिल्हयातील नगर परीषद, महानगरपालीका,
जिल्हा परीषद आणि पंचायत समित्या या स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकांची
पूर्वतयारी करण्यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक
कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे  पालकमंत्री, आमदार अमित विलासराव
देशमुख यांच्या सुचनेनूसार काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा
मतदारसंघनिहाय प्रभारीची निवड केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.
नानाभाऊ पटोले यांच्या अंतिम मंजुरीनंतर जिल्हा काँग्रेसने प्रभारी
नियुक्तीची यादी प्रसिद्धीस दिली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत तसेच मागच्या
वर्षात झालेल्या नगर पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणूकीतही काँग्रेस
पक्षाला चांगले यश प्राप्त झालेले आहे. जिल्हयात पक्षाला मिळत असलेला
उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता आगामी निवडणूकीत योग्य नियोजन करून मोठा
विजय संपादन करण्यासाठी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या
सुचनेनूसार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी विधानसभानिहाय
प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची
अंतिम मंजुरी घेतल्यानंतर सदरील प्रभारींची यादी जिल्हा काँग्रेसच्या
वतीने आत्ता प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
आगामी काळात लातूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था
निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा मतदारसंघ निहाय नियुक्ती
केलेल्या या प्रभारीमध्ये लातूर ग्रामिण मतदार संघासाठी ॲड. किरण जाधव तर
लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी सर्जेराव मोरे यांची नियुक्ती करण्यात
आली आहे, अहमदपूर विधानसभा मतदार संघ ॲड. प्रमोद जाधव, उदगीर विधानसभा
मतदार संघ रविंद्र काळे, निलंगा विधानसभा मतदार संघ विजय देशमुख आणि औसा
विधानसभा मतदार संघासाठी ऍड समद पटेल यांची नियुक्ती झाली आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले हे प्रभारी जिल्हाभरातील
पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रिय तसेच राज्यस्तरावरील पक्षाचे पदाधिकारी,
स्थानीक प्रातळीवरील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध
क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना यांचे प्रतिनिधी, नागरीक यांच्या बरोबर
चर्चा करून पक्षाची बांधणी करतील, महानगरपालीका, नगर परीषद, जिल्हा
परीषद, पंचायत समिती व इतर संस्थाच्या निवडणूकीच्या संदर्भाने रण्रनीती
ठरवून, निरीक्षकांचीही नियुक्ती करतील. निरीक्षका मार्फत उमेदवार
ठरवीण्याच्या दृष्टीने चाचपणी करतील, त्याच बरोबर वेळोवेळी
पक्षनेृतृत्वाला अहवाल सादर करतील असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल
उटगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

أحدث أقدم