शारदा सेमी इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के

 शारदा सेमी इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के      

 लातूर, दि. ५ - येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाने शंभर टक्के यशाची उज्ज्वल परंपरा गेली दोन वर्षापासून कायम राखली आहे.
या विद्यालयातून आदित्य साखरे हा प्रथम, सिद्दीक शेख हा द्वितीय तर ऋतुजा मडोळे ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले तसेच त्यांना शिकवणार्‍या सर्व शिक्षकांचेही कौतुक केले. यावेळी शारदा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य दत्ता घारगे, शाळेचे मुख्याध्यापक प्रा. एल. टी. पुरी, रोहित जाधव, मानसी पाटील, अनघा पाटील, रेणुका समुद्रे, साधना भेटे, प्रियल गोखले, गीतांजली गिरी, अश्विनी पवार, शारदा नागभट्टी, माधुरी पाटील, ऐश्वर्या बागल, उषा गुडदे आदि शिक्षकांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم