लातूर तालुक्यात कोतवालांची 15 पदे भरणार; 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार

लातूर तालुक्यात कोतवालांची 15 पदे भरणार; 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार

लातूर : महसूल व वन विभागाच्या 17 मे 2023 रोजीचे पत्र आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार लातूर तालुक्यातील कोतवाल पदाच्या रिक्त 19 जागांपैकी 15 जागांची पदभरती राबविण्यात येत आहे. या पदासाठी 24 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत लातूर तहसील कार्यालयात अर्ज वितरण व स्वीकृत केले जातील. परीक्षेबाबतची सर्व माहिती लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.latur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم