श्रावण सरी

    श्रावण सरी


श्रावण मासी हर्ष मानसी
आल्या आल्या श्रावण सरी
स्वागत करण्या सज्ज होऊनी
क्षणात भिजल्या सा-या परी

ऊन पावसाच्या या लपंडावात
सूर्यही मनमुराद चिंब न्हाला
त्याचा हा खेळ बघूनी
झाडांनाही मग हुरुप आला

त्याच्या अशा अवचित आगमनाने
हिरवा शालू ओला झाला
चराचरच्या या अद्भूत चमत्काराने
गुलाब मोगरा सुगंध फुलला

चिव चिवाटाच्या कल्लोळात
मयुर-कोकिळेचा आवाज खुलला
धरणी वरती बदल बघूनी
श्रावण सरी मस्तीत बरसला

सुरु झाल्यात बघा आता 
रिमझिम श्रावण सरी
सुुस्वागतम करू आनंदाने
त्याचे सारे आपल्या दारी

          
            शब्दस्पर्शी
    कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Post a Comment

أحدث أقدم