हासेगाव व लातूर डी. फार्मसीला उत्कृष्ट मानांकन

हासेगाव व लातूर डी. फार्मसीला उत्कृष्ट मानांकन  
औसा प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई कडून दर वर्षी तंत्रशिक्षण संस्थांचे शैक्षणिक अवेक्षण केले जाते व त्यांना मानांकन दिले जाते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर (इन्स्टिटयूट कोड १७५१) डी.टी.ई. कोड २५३८ व लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव (इन्स्टिटयूट कोड २००१) डी.टी.ई. कोड २५५३ या महाविद्यालयास नुकतेच उत्कृष्ट मानांकन जाहीर झाले आहे.    
             या बद्दल महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई चे संचालक श्री प्रमोद नाईक यांनी आपल्या अभिनंदनपर पत्राद्वारे संस्थेचे कौतुक करून अभिनंदन केले व संस्थेची शैक्षणिक कामगिरी भविष्यात अशीच वाढत जावो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. याप्रसंगी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगावच्या प्राचार्या डॉ.श्यामलीला शिवलिंग जेवळे (बावगे) व लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूरचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
            महाविद्यालयाला उत्कृष्ट मानांकन मिळण्याचे कारण म्हणजे महाविद्यालयाचे दरवर्षी सर्वेक्षण केले जाते या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासह गुणवत्तेचा दर्जा पाहिला जातो, तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा याचा विचार होतो. अनुभवी प्राध्यापक वृंद सर्वांचे टीम वर्क आणि संस्थेने दिलेला प्रतिसाद या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत असे प्रतिपादन संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे यांनी केले . 
            या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. विरेंद्र मेश्राम, गंगाधर धानुरे, सताळा गावचे सरपंच शिवलिंगआप्पा जळकुटे व लातूरचे वकील पी. एम. देशपांडे आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, ज्ञानसगर विद्यालय हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डी फार्मसी महाविद्यालयाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم