ऑल इंडिया संपादक संघाच्या लातूर जिल्हाध्यक्ष हिराप्रकाश कांबळे यांची निवड

ऑल इंडिया संपादक संघाच्या लातूर जिल्हाध्यक्ष हिराप्रकाश कांबळे यांची निवड
लातूर ः ऑल इंडिया संपादक संघ हे मासिक, पाक्षिक, साप्ताहिक व दैनिकाच्या संपादक, पत्रकारांना जोडण्याचे एक महत्वपूर्ण कार्य गेल्या काळापासून संपूर्ण भारत देशात करत आहे. देशभरात संपादक व पत्रकारांचा आवाज उठविण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून होते आहे. हा पत्रकार संघ महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, बंगाल या राज्यामध्ये संपादक व पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करत आहे.
या ऑल इंडिया संपादक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण बौध्द आहेत तर राष्ट्रीय कोषाध्यक्ष जितेंद्र चौधरी, राष्ट्रीय सचिव सतीश आर्या, राष्ट्रीय उपाध्यक्ष कुमार गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या बैठकीत लातूर येथील मराठवाडा सम्राट नेता या वृत्तपत्राचे संपादक हिराप्रकाश मिलींद कांबळे यांना लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. येणार्‍या काळात लातूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी हिराप्रकाश मिलींद कांबळे हे आग्रही राहणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या संघामध्ये सामील होवून एकजुट होवून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा. व जास्तीत जास्त संख्येने आमच्या या ऑल इंडिया संपादक संघाचे सभासद होवून संघ मजबुत करावा.

Post a Comment

أحدث أقدم