लक्ष्मी अर्बन बँकेच्या संचालिका सौ. कमलादेवी राठी यांना श्रीमती सुशिलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार जाहीर

लक्ष्मी अर्बन बँकेच्या संचालिका सौ. कमलादेवी राठी यांना श्रीमती सुशिलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार जाहीर
लातूर: मराठवाड्यातील नामांकित लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर या बँकेच्या संचालिका सौ. कमलादेवी विजयकुमारजी राठी यांना दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स असो. लि, मुंबई यांच्याकडून सन २०२२ साठीचा श्रीमती सुशिलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या मातोश्री कै. सुशिलादेवी यांच्या नावाने बँकिंग, सहकार व सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या महिलांना संपूर्ण महाराष्ट्रातून एका महिलेस हा पुरस्कार दिला जातो. सौ. कमलादेवी विजयकुमारजी राठी या लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालिका आहेत, त्यांनी मागील काळात बँकिंग, सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. राजस्थानी महिला मंडळ लातूर च्या माध्यमातून त्यांनी महिलांना सक्षम बनविण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. बचत गट, विविध शिबिरे, महिला अधिवेशन, सामुहिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील हजारो महिलांना मार्गदर्शन करून महिलांचे आर्थिक सबलीकरण केले आहे.

सौ. कमलादेवी राठी यांचे पती श्री विजयकुमारजी राठी हे रोटरी क्लबचे माजी गव्हर्नर, National Association for Blind या संस्थेचे लातूरचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व NAB चे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आहेत. श्री राठी यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून अमेरिका कॅनडा अशा २५ पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास केला आहे. त्यांनाही आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सौ. कमलादेवी राठी यांच्या सामाजिक कार्याच्या यशामागे त्यांचे पती श्री विजयकुमाराजी राठी यांचा मोलाचा वाटा आहे. सदरील पुरस्कार म्हणजे लातूर जिल्ह्यातील सहकारी बँकांसाठीहि अभिमानाची बाब आहे. मराठवाड्यातील माहेश्वरी समाजात अशा पद्धतीचा पुरस्कार मिळवणाऱ्या सौ. राठी या पहिल्याच महिला आहेत, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी नाशिक येथे होणार आहे.

लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात बँकेच्या महिला संचालिकाचा होत असलेला सन्मान म्हणजे बँकेसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. बँकेचे संचालक मंडळ, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांनी या पुरस्कारामुळे आनंद व्यक्त केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم