धर्माचे आचरण करणे मानव जातीचे आद्यकर्तव्य -जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र महास्वामी

धर्माचे आचरण करणे मानव जातीचे आद्यकर्तव्य -जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र महास्वामी
औसा / प्रतिनिधी-धर्माचे पालन करणे हे फक्त मानव जाती साठीच नाही तर पृथ्वीतलावरील सर्व प्राणीमात्राचे आद्य कर्तव्य आहे. धर्माचा सतत विजय होत असतो
आणि अधर्म विनाशाकडे घेऊन जातो. म्हणून धर्मानेच विश्वाला शांती मिळेल असा संदेश प्रत्येक धर्मगुरू देत असतात. धर्माचे पालन करणे हे मानव जातीचे
आद्य कर्तव्य आहे. असे प्रतिपादन उज्जैन पिठाचे श्रीमदजगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र महास्वामीजी यांनी केले. औसा येथील हिरेमठ संस्थांनच्या ८३ व्या
वार्षिक उत्सव व शिवदीक्षा सोहळा निमित्त आयोजित धर्मसभेला संबोधित करताना ते बोलत होते. धर्मपिठावर ष.ब्र. १०८ श्री निळकंठ शिवाचार्य महाराज, ष.
ब्र. १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज (शिवकथाकार), हिरेमठ संस्थांचे मार्गदर्शक डॉ शांतिवीरलिंग शिवाचार्य महाराज आणि संस्थांनचे पिठाधिपती बालतपस्वी
ष..] १०८ श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती होती. दिनांक १३ जुलै रोजी आयोजित धर्मसभेत आपल्या अमृतवाणीतून बोलताना श्रीमदजगद्गुरु
पुढे म्हणाले की, धर्म हा कोणत्याही मंदिर मठामध्ये किंवा धर्माचे पालन करणाऱ्या गुरु यांच्याशीच नाही तर दैनंदिन जीवनामध्ये वागत असणाऱ्या प्रत्येक
प्राणीमात्राशी निगडित आहे. काया, वाचा, मनाने आपल्या वर्तनातून इतरांना कसल्याही प्रकारच्या वेदना होऊ नये याची काळजी घेणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे.
धर्माचे पालन करण्यासाठी गरीब किंवा श्रीमंत तसेच लहान अथवा थोर असा भेदभाव करता येणार नाही. प्रत्येकाने आपले शुद्ध वर्तन ठेवून इतरांना शक्य
तेवढी मदत करणे आवश्यक आहे. मानवाला बोलण्यासाठी तोंड पाहण्यासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान, श्वास घेण्यासाठी नाक तर विचार करण्यासाठी बुद्धी
प्राप्त झालेली आहे. याचा वापर चांगले बोलणे चांगले पाहणे, चांगले ऐकणे आणि इतरांना दुःख होऊ नये याचा विवेक बुद्धीने विचार करून वागणे म्हणजेच
धर्मपालन होय असेही श्रीमद जगद्गुरु यांनी स्पष्ट केले. यावेळी महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.
हिरेमठ संस्थानचे आधारस्तंभ लिंगेवय गुरुनिरंजन शिवाचार्य महाराज यांनी वार्षिक महोत्सव व शिवदिक्षा सोहळ्याची घालून दिलेली परंपरा अत्यंत कौतुकास्पद
आहे असे सांगून संस्थानच्या धर्मकार्याची प्रशंसा केली. आशीर्वाचनासाठी हजारो महिला, पुरुष व युवक हिरेमठ संस्थांनच्या सभागृहामध्ये उपस्थित होते.
मागील १५ दिवसापासून संस्थांच्या या उपक्रमामध्ये विविध माध्यमातून सेवा देणाऱ्या मान्यवरांचा तसेच महिला भजनी मंडळ, अन्नदाते व समाजातील विविध
क्षेत्रातील मान्यवरांचा श्रीमत जगतगुरु यांच्या हस्ते सन्मान करून जगद्गुरुंनी आशीर्वाद प्रदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरशैव समाजाचे अध्यक्ष
सुभाषअप्पा मुक्ता, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, नागेश इळेकर, सचिनअप्पा उटगे, वेदमूर्ती चंद्रशेखर हिरेमठ, वैजनाथ शिंदे यांच्यासह वीरशैव युवक
संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील होते.

Post a Comment

أحدث أقدم