हासेगाव बी फार्मसी विद्यार्थ्यांचे सुयश
औसा (प्रतिनिधी ) हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ़ बी फार्मसी चा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड अंतर्गत चालणाऱ्या उन्हाळी परीक्षा २०२३ चा निकाल लागला . बी फार्मसी चतुर्थ वर्षातील आठवे सत्रात कु. इनामदार फरीन मुझ्झमिल ०८. ९९ (सी.जी.पी ए.) % घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक लोहकरे कोमल बब्रुवान ०८. ९८ (सी.जी.पी ए.) % गुण घेऊन दुसरा तर औरादे यशवंत जोतिराम याने ८. ९७ (सी.जी.पी ए.) % तिसरा क्रमांक मिळवला आहे त्याच बरोबर तृतीय वर्षातील सहावे सत्रात शेख सबा ०८. ७७ (सी.जी.पी ए.) % घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांकबोबडे ऋतुजा ०८. ५८ (सी.जी.पी ए.) % गुण घेऊन दुसरा तरमते प्रियंका आणि रेड्डी शीतल याने प्रत्येकी ०८. ५० गुण घेऊन महाविद्यालयातून तिसरा क्रमांक मिळवला आहे .
महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षातून १०७ विध्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. एकूण महाविद्यालयाचा चतुर्थ वर्षाचा निकाल ७८ .७८ % लागला आहे.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे , संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ) , लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह , लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
إرسال تعليق