व्ही.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसीचे जी पॅट २०२३ परीक्षेत घवघवीत यश.

 व्ही.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसीचे जी पॅट २०२३ परीक्षेत घवघवीत यश

लातूर/प्रतिनिधी- राष्ट्रीय स्तरावरील पार पडलेल्या जी पॅट २०२२-२३ परीक्षाचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या परीक्षेत विलासराव देशमुख फाउंडेशन संचलित व्ही.डी.एफ.स्कुल ऑफ फार्मसी लातूरच्या ९ विद्यार्थ्यांनी जी पॅट २०२३ परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.जी.पॅट परीक्षा ही फार्मसी पदव्युत्तर परिक्षेकरिता आवश्यक असून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली यांच्या मार्फत घेतली जाते.या परीक्षेत बी.फार्मसी अंतिम वर्षात शिकत असलेल्या मीनाक्षी शिंदे (एनटीए स्कोर ९७.३५ एआयआर १६५७), विष्णू शिंदे (एनटीए स्कोर ९७.१४ एआयआर १८१६), प्रदीप सातपुते (एनटीए स्कोर ९६.६९ एआयआर २०५६), श्वेता कूटवाड (एनटीए स्कोर ९५.९० एआयआर २५१४), श्रद्धा देशमुख (एनटीए स्कोर ९३.९३ एआयआर ३८१५), माहेश्वरी नवघरे (एनटीए स्कोर ९२.५१ एआयआर ४६६१), वैष्णवी देशमुख (एनटीए स्कोर ९२.३१ एआयआर ४८२८), सुनील खूपसे (एनटीए स्कोर ८२.०३ एआयआर ११२५०), लक्ष्मी सूर्यवंशी (एनटीए स्कोर ७८.३७ एआयआर १३६२४) असे गुण या गुणवंत विद्यार्थ्यानी संपादित केले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, कार्यकारी विश्वस्त सौ.अदिती अमित देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी कौशल पौराना, प्राचार्य डॉ.बी.एस.वाकुरे, यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم