ईशान्येतील स्थिती हाताळण्यासाठी दृरदृष्टी धोरणांची गरज-हेमंत पाटील


ईशान्येतील स्थिती हाताळण्यासाठी दृरदृष्टी धोरणांची गरज-हेमंत पाटील
मुंबई-देशात सांस्कृतिक तसेच सामरिक दृष्टीने ईशान्य भारत अत्यंत महत्वाचा आहे. विविधतेने नटलेल्या भारताला पुर्णत्व देण्याचे काम 'सेव्हन सिस्टर' करतात.पंरतु, मणिपूरमधील हिंसाचारामुळे ईशान्य भारताला ग्रहण लागले आहे.नागालॅन्ड सह अवघ्या देशभरात मणिपूर हिंसाचाराचे पडसाद उमटत आहे. अशात ही स्थिती हाताळण्यासाठी दृरदृष्टी धोरणांची गरज असल्याचे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.हिंसाचाराच्या कारणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकतेवर यानिमित्ताने पाटील यांनी भर दिला.
मणिपूरमधील हिंसाचारानंतर विरोधकांच्या 'इंडिया'ने केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.पंरतु,बहुमतात असतांना देखील केवळ पंतप्रधानांनी मणिपूर मधील स्थितीवर सभागृहात भाष्य करावे यासाठी विरोधकांनी आणलेल्या प्रस्ताव या स्थितीवर उतारा नाहीच.विरोधकांनी त्यामुळे अशा प्रकारच्या प्रस्तावांऐवजी केंद्रासोबत मिळून पेटलेल्या मणिपूरवरील स्थितीवर तोडगा काढला पाहिजे,असे प्रतिपादन पाटील यांनी व्यक्त केला.
अविश्वास प्रस्तावावर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेला पंतप्रधान उत्तर देखील देतील.पंरतु, यातून मणिपूरच्या स्थितीसंबंधी काही एक साध्य होणार नाही,असे देखील पाटील म्हणाले.केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकत सर्व पक्षीय एक शिष्टमंडळ मणिपूरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवावे,अशी मागणी देखील पाटील यांनी केली.एनडीए आणि इंडिया यांनी 'हिंदुस्तान' साठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم