डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी च्या यशस्वी निकालाची परंपरा कायम

डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी च्या यशस्वी निकालाची परंपरा कायम  

लातूर/प्रतिनिधी -राधेय चॅरिटेबल ट्रस्ट लातूर व्दारा संचालित डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी (D. Pharm) चा MSBTE बोर्डच्या उन्हाळी २०२३ परीक्षेचा ८३% टक्के निकाल लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश बेंबडे यांनी प्रथम व व्दितीय वर्षातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या D. Pharmacy व्दितीय वर्षात शिकत असलेली अखिल सय्यद 80% व प्रथम वर्षात शिकत असलेली महालिंगे अंजली -७३.५०% गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. व्दितीय वर्षात शिकत असलेली पटेल शबाना 77.80% व प्रथम वर्षात शिकत असलेला गुरले पल्लवी 72.50% गुण घेऊन महाविद्यालयातून व्दितीय आले आहेत.
व्दितीय वर्षात शिकत असलेला गवळी दिव्या 77% व प्रथम वर्षात शिकत असलेला घोरपडे ओंकार 71.80% गुण घेऊन महाविद्यालयातून तृतीय आले आहेत तर 39 विद्यार्थ्यांनी 68% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले असून 35 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
संस्था अध्यक्ष श्री दिनेश बेंबडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी घेतलेली गगन भरारी ही देशाच्या प्रगतीत भर घालणारी बाब आहे व याचा सार्थ अभिमान असल्याचे मत व्यक्त केले तसेच डी बी कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व नेत्रदीपक यश हे देश तसेच जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याजोगे आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासतील चिकाटी, भविषयाबाबतची उत्सुकता तसेच संस्थेतील सर्व प्राध्यापक वृंदांचे अथक परिश्रम व पालकांची जागरूकता याच्या संयुक्ताने ही गुणवत्ता व यश संपादन केल्याचे मत व्यक्त केले. संस्थेच्या सचिव सौ. प्रणिताताई बेंबडे यांनी यशस्वीतांचे कौतुक करून अभिनंदन केले.  
फार्मसीचे प्राचार्य डॉ. जयदीप यादव सर, एम.बी.ए. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत ढगे तसेच डी.बी.पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. विशाल जाधव सर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यकरिता शुभेच्छा देत अशीच गुणवत्ता येणार्या काळात जोपासण्याचे आवाहन केले. शैक्षणिक संकुलाचे समन्वयक विवेक बेंबडे यांनी विद्यार्थ्यानी संपादन केलेल्या यशाबद्दल अभिनंदन करत हे यश ही आयुष्याच्या पुढील वाटेवरील यशाची गुरुकिल्ली असून ते असेच जोपासण्याचे आवाहन केले. तर महाविद्यालयाचे प्राध्यापक ऐश्वर्या नवरखेले, घुले रतन, मोनिका इंगळे, शेख इर्शाद, स्वप्नाली दांडेवाड, अश्विनी रोडे, विकी किणीकर, उत्सुर्गे पूजा, गणेश सराफ , दत्ता सुरवसे, अविनाश बिराजदार, गोपाळ शिंदे, जगदीश गिरी, ममता आबादार, वैष्णवी गोळे, माने शंतनू, शिवाजी एडके, फहीम पठाण, शुभांगी बनसोडे व शिक्षकेत्तर कर्मचारी कांबळे बलवंत, पवार ज्योतीराम, अनिल चव्हाण, गणेश चव्हाण यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم