पदोन्नतीचे आरक्षण कृती समितीच्या अध्यक्षपदी रवी कुरील यांची निवड

पदोन्नतीचे आरक्षण कृती समितीच्या अध्यक्षपदी रवी कुरील यांची निवड 
लातूर:महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली 2017 साल पासून बंद असलेल्या पदोन्नतीचे आरक्षण शासनाकडून मिळवून घेण्यासाठी कृती समिती गठीत करण्यात आली . या कृती समितीच्या लातूर जिल्हा प्रमुख पदी रवी कुरील यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. कृती समितीमध्ये मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते यू.डी. गायकवाड ,दिलीपराव जाधव ,जी.टी. होसुरकर यांची निवड करण्यात आली तसेच कार्यकारणी मध्ये नागसेन कांबळे ,किशोर गायकवाड , राजकुमार हिंगे ,प्रवीण सूर्यवंशी ,शांतीलाल लांडगे, दीपक कांबळे ,माधव कांबळे ,रंजीत लांडगे, विद्यासागर काळे व व्यंकटराव दंतराव यांचा  समावेश करण्यात आला . कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला संविधानिक मार्गाने निवेदन देवून आंदोलन उभे केले जाणार आहे .मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण  लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला कृती समितीच्या माध्यमातून दिनांक सात ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांना पदोन्नतीचे आरक्षण लागू करणेबाबत यांना पदोन्नतीच्या आरक्षण लागू करणे बाबत निवेदन देण्यात येणार आहे .

Post a Comment

أحدث أقدم