हासेगावच्या फार्मसी कॉलेज चार विद्यार्थी जी पॅट परीक्षेत सुयश

हासेगावच्या  फार्मसी कॉलेज चार विद्यार्थी जी पॅट परीक्षेत सुयश
         
 औसा/प्रतिनिधी- भारत सरकारच्या मानव विकास संसाधन मंत्रालयातर्फे फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी  घेण्यात येणाऱ्या परीक्षेत औसा तालुक्यातील हासेगाव येथील श्री  वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज  फार्मसी हासेगाव महाविद्यालयातील  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.अखिल भारतीय स्तरावर  घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना पदव्युत्तर एम. फार्मसीचे शिक्षण घेत असताना दिल्लीच्या ए. आय. सी . टी . इ.कडून वार्षिक १४८८०० इतकी शिष्यवर्ती देण्यात येते . 
          यामध्ये कु.डोंगरे सायली 78.77 % गुण,कुलोमटे प्रगती 92.31 % गुण,गायकवाड विशाल 93.35 %आणि ओटले सिद्धार्थ यांना 83.14 % गुण घेऊन उत्तीर्ण झाले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.या करण्यासाठी प्रमुख अतिथी  म्हणून  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , प्राचार्या डाॅ.सौ.शामलीला  बावगे (जेवळे ) यांच्या हस्ते  जी.पॅट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सन्मान चिन्ह शॉल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. 
    यावेळी    लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी  लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर चे प्राचार्य सर्व  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم