गोर गरिबांच्या घरी असलेले खराब मीटर बदलवून वीज बिल कमी करावे:- अभिजित कुडे

 गोर गरिबांच्या घरी असलेले खराब मीटर बदलवून वीज बिल कमी करावे:- अभिजित कुडे
वरोरा:- तालुक्यातील खराब मीटर चे कारण सांगून सर्व सामान्य माणसाला अवाढव्य वीज बिल आकारण्यात येत आहे. अनेक लोकांच्या तक्रारी युवा सेना सैनिक निखिल मांडवकर, अभिजित कुडे यांना येताच त्यांनी तात्काळ महावितरण कार्यालयात धडक दिली. विधानसभा अध्यक्ष रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धडक दिली. मीटर चे रीडिंग बरोबर न घेता ग्राहकांना अवाढव्य वीज बिल पाठवण्यात आले त्या संबंधी शिवसेना युवासेना ने महावितरण कार्यालय गाठले. अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून खराब मीटर तात्काळ बदलावी अशी मागणी केली. सर्व सामान्य माणसाला हे वीज बिल परवडणार नाही वीज बिल कमी करून घ्यावी व ज्या मीटर चे रीडिंग व्यवस्थित येत नाही ते बदलवून द्यावे. मीटर रीडिंग तेवढे जडले नसून देखील ज्याला 700,800 बिल येत होते त्याला 4500,5000 बिल आले. अधिकार्‍यांनी सांगितले की मागील काही महिन्यापासून मीटर रीडिंग बरोबर येत नव्हते त्या मुळे 3,4 महिने अंदाजे बिल दिले आता रीडिंग बरोबर आहे त्यामुळे इतके बिल आकारण्यात येत आहे. अचानक इतके विल बिल आल्याने सर्व सामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडते त्यामुळे सर्व खराब मीटर तात्काळ बदलावी अशी मागणी निखिल मांडवकर अभिजित कुडे यांनी केली. यावेळी रुपेश चिंचोलकर, आदित्य मडावी,रितिक सावरकर ,चेतन बावणे, प्रणय कामटकर, वैभव कोवे ,अनुप पावडे ,करण मानकर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم