लातूर काॅलेज आॅफ फार्मसीत सॉफ्ट स्किल आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

लातूर काॅलेज आॅफ फार्मसीत सॉफ्ट स्किल आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
        औसा (प्रतिनिधी) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयात सॉफ्ट स्किल आणि करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून क्याट्यालीस्ट ग्रुप्स संस्थे चे संस्थापक बुलानी राहुल , संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे ,संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, प्राचार्या डॉ श्यामलीला जेवळे (बावगे) ,इत्यादी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती मातेच्या मूर्तीचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला . 
    या प्रसंगी प्रास्ताविक पर भाषण प्राचार्या डॉ श्यामलीला जेवळे (बावगे) यांनी विद्यार्थ्याचा व्यक्तीमत्व विकास आणि स्टेज करेज असणं खूप गरजेचे आहे असे थोडक्या शब्तात मोलाचे मार्गदर्शन केले .

              त्याचबरोबर संस्थापक बुलानी राहुल यांनी एम.बी.ए. या विषयाबरोबर संवाद कौशल्य ,ड्रेस स्टाईल , स्टेज करेज ,बॉडी लँग्वेज , विधार्थ्यानी मुलाखत कशी दिली पाहिजे मुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे, आत्मविशास ,चेहऱ्यावर हसू तसेच डोळ्यात डोळे टाकून बोलावे ,संवाद स्पष्ट पणे साधावा , योग्य भाषा निवड अशा अनेक मुद्यावरती मौल्यवान मार्गदर्शन केले. ते पुढे बोलले राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे , एन. एस. एस. माध्यमातून विध्यार्थींचा शारीरिक ,मानसिक आणि सामाजिक विकास होतो असे हि ते बोलत होते. 
            लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर चे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. बालाजी खवले यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم