हासेगावच्या फार्मसीत काॅलेज मध्ये महापुरुषांना अभिवादन

हासेगावच्या फार्मसीत काॅलेज मध्ये महापुरुषांना अभिवादन 
         औसा (प्रतिनिधी )  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ़ फार्मसी , हासेगाव आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत   लोक मान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि थोर  समाज सुधारक , संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व कादंबरीकार साहित्य  रत्न ,  लोकशाहिर  डॉ . अण्णा  भाऊ  साठे  यांची १०३  जयंती उत्साहात  साजरी  करण्यात अली. 
          या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी   संस्थेचे सचिव  वेताळेश्वर बावगे ,संस्थेचे कोषाध्यक्ष  शिवलिंग जेवळे,   प्राचार्या डॉ श्यामलीला  जेवळे (बावगे)   ,इत्यादी  मंचावर उपस्थित होते. त्याच बरोबर रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश बनसोडे ,  रा. से. यो.चे सर्व  वॅरिंटियर    लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी  लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर चे प्राचार्य सर्व  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم