मूलांना आई म्हणायला शिकवा आपली संस्कृती जतन करा- ह.भ.प.विवेक महाराज व्यास आळंदीकर

मूलांना आई म्हणायला शिकवा  आपली संस्कृती  जतन करा- ह.भ.प.विवेक महाराज व्यास आळंदीकर  
भादा/प्रतिनिधी - आजकाल अनेक लहान मूलं आपल्या आईला मम्मी म्हणूण हाक मारतात पण आपल्या मूलांना आई म्हणायला शिकवा व आपली संस्कृती जतन करा. असा मोलाचा उपदेश भादा येथील हनूमान मंदिरात चालू असलेल्या रामकथेतून रामायणचार्य. हभप. विवेक महाराज व्यास आळंदीकर यांनी भक्तांना केला. रामकथेचे पाचवे पूष्प आपल्या सूमधूर वाणीतून गूंफताना महाराजांनी भारतीय संस्कृती आपणच का जतन करायला पाहीजे याचे महत्व विशद केले. मंम्मी हा इंग्रजी शब्द असून त्याचा खरा अर्थ एखाद्या व्हिआयपी मृत माणसाच जतन करूण ठेवलेला मृतदेह असा होतो. तर भारतीय संस्कृतीत आई हा कितीतरी गोङ शब्द आहे. आपली संस्कृती महान आहे . आपल्या लेकरांना आई म्हणायला शिकवा .व आपली संस्कृती जतन करा असेही ते म्हणाले . याच बरोबर महाराजांनी टिकली आणी कूंकवातला फरक भक्तांना सागून कूंकवाचं किती महत्व आहे . हे हि सांगीतले.महाराजांच्या रसाळ व मधूर वाणीतून रामकथा श्रवण करण्यासाठी भादा आणी परीसरातून भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित रहात असून लहान लेकरे , तरूण , आणी वृद्धध रामभक्तीत तल्लीन होवून उपस्थित रहात आहेत.

Post a Comment

أحدث أقدم