" मेरी मिट्टी मेरा देश " या अभियानांतर्गत श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर,शाळेत प्रभात फेरी संपन्न

 " मेरी मिट्टी मेरा देश " या अभियानांतर्गत श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर,शाळेत प्रभात फेरी संपन्न
औसा/प्रतिनिधी- श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर औसा येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत        
॓॓" मेरी मिट्टी मेरा देश " या अभियानानिमित्त नगर परिषद औसा चे मुख्य अधिकारी सन्माननीय अजिंक्य रणदिवे साहेब यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पंचप्राण शपथ दिली. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी शहरातून काढण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद ,औसा चे मुख्य अधिकारी सन्माननीय अजिंक्य रणदिवे साहेब होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक माशाळे डी. एस. यांनी केले. त्यांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी शाळेतील शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी , पालक वर्ग व सर्व नगरपरिषद चे कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्मा मॅडम यांनी केले व सर्व उपस्थित यांचे आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم