स्नेहश्री ग्रुपचा भव्य दुध संकलन व उत्पादन प्रकल्पाला सुरुवात होणार

स्नेहश्री ग्रुपचा भव्य दुध संकलन व उत्पादन प्रकल्पाला सुरुवात होणार
औसा/प्रतिनीधी- तालुक्यातील स्नेहश्री ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने स्नेहश्री अग्रोजेनिक्स प्रा लिमिटेड अंतर्गत 50 हजार लीटर साठवण क्षमता असणारे दुध शीतकरण केंद्र सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून कार्यान्वित होत असून जानेवारी महिन्यांच्या सुरुवातीस सर्व दुध व दुग्धजन्य पदार्थांचे बायो प्रोडक्ट्स ची पण निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असून या दुध शीतकरण केंद्रात औसा तालुका व पंच क्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध विक्रीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन तथा तालुक्याचे भूमिपुत्र श्रीशैल उटगे यांनी केले आहे.
      औसा तालुक्यात स्नेहश्री अग्रोजेनिक्स प्रा लिमीटेड अंतर्गत औसा एम आयडीसी परिसरात आधुनिक स्वरूपाचे भव्य असे दुग्ध संकलन व शीतकरण केंद्र उभारण्यात आले असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात असून औसा शहर व परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईचे व म्हशीचे दूध या शीतकरण केंद्रामध्ये संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यांतील सर्वात मोठे व मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक स्वरूपाचे दुग्ध शीतकरण केंद्र असून यांची साठवण क्षमता 50 हजार लिटर इतकी आहे. या केंद्रामध्ये ग्रामीण व कष्टकरी भागातील शेतकऱ्यांना गाईचे व म्हशीचे दूध या शीतकरण केंद्रामध्ये संकलनासाठी एक चांगली सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून या मधून तालुक्यांतील जवळपास 4-5 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने हे दूध शीतकरण केंद्र अनेकांना फायदेशीर ठरणार आहे.
      या शीतकरण केंद्र तालुक्यांतील पहिलाच प्रकल्प असून यामध्ये दुधाला चांगला भाव मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या केंद्रापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्यांना या दूध संकलन केंद्राचा जरूर लाभ मिळणार आहे. या दूध शीतकरण केंद्राच्या उभारणीसाठी संस्थेचे चेअरमन श्रीशैल उटगे, डायरेक्टर शिवम उटगे,सत्यम उटगे,सहाय्यक महाव्यवस्थापक बालाजी पवार,दुध संकलन व्यवस्थापक राहूल बिराजदार इतर कर्मचारी प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रकल्पांचा फायदा होणार असून तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..

Post a Comment

أحدث أقدم