बसवेश्वर पतसंस्थेकडून बसस्थानक परिसरात वृक्षारोपण

बसवेश्वर पतसंस्थेकडून बसस्थानक परिसरात वृक्षारोपण मुरूम (प्रतिनिधी) : येथील श्री महात्मा बसवेश्वर व्यापारी नागरी पतसंस्थेच्या पुढाकाराने बसस्थानक परिसरात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. १८) रोजी विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी या वृक्षांच्या संवर्धनाकरिता लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे l पक्षीही सुस्वरे आळवीती ॥ येणे सुखे रुचे एकांताचा वास I नाही गुणदोष अंगा येत ॥ या ओळीप्रमाणे पतसंस्थेकडून परिसरात वृक्ष लागवड करून जोपासना करण्याचा संकल्प केला जात आहे. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, उपाध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, संजय सावंत, महेश निंबरगे, शबीर नदाफ, बागवान, शरणप्पा पाताळे , राघवेंद्र शिंदे, श्रीकांत कारभारी, वाहतूक नियंत्रक राजपुत्र सह संचालक मंडळ, कर्मचारी वृद्ध व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم