ऑनलाइन मुळं ऑनलाइन जुगारवाल्याची चांदी

 ऑनलाइन मुळं ऑनलाइन जुगारवाल्याची चांदी
औसा/ प्रतिनिधी- सध्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ऑनलाइन जुगाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून,या ऑनलाइन जुगारामुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे शासनाकडून जुगार खेळण्यास बंदी असतानाही दुसरीकडे राजरोजपणे जुगार खेळला व खेळविला जातो.त्यामध्ये रमी,तिरट,तीनपत्ती,पपलू,असे खेळ असतात असा हा जुगार खेळत असताना जर पोलिसांच्या जाळ्यात कोणी सापडला की,त्याच्यावर कारवाई होते मुद्देमाल जप्त केला जातो.व जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला जातो. परंतु सध्या जगभरात सोशल मीडियाची जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून याचाच गैरफायदा शहरी तथा ग्रामीण भागातील तरुण पिढी घेतानाचे दिसून येत आहे.या ऑनलाइन खेळामध्ये जंगली रम्मी,तीनपत्ती,लुडोकिंग,असे खेळ असून,या खेळाची जाहिरातही मोठमोठ्या सिने कलावंतांकडून केली जाते.विशेष म्हणजे ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळताना दिसून येत आहे.हे असंच चालत राहिले तर तरुण पिढीचे भविष्यच नाही तर आर्थिक परिस्थिती ही बिकट होण्याच्या मार्गावर असून,अशा खेळांना प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم