प्रशांत सोमवंशी हे बहुजन हिताय मित्र पुरस्काराने सन्मानित

प्रशांत सोमवंशी हे बहुजन हिताय मित्र पुरस्काराने सन्मानित
मुरुम (प्रतिनिधी) : उमरगा येथील बहुजन हिताय ट्रस्ट संचलित बहुजन हिताय वसतिगृहाच्या वतीने भंते संगरक्षित यांच्या ९८ व्या जयंती निमित्ताने बाल विकास अधिकारी डी. के. वाघ, विस्तार अधिकारी संतोष वांगवडे, आदर्श विद्यालयाचे माजी प्राचार्य सोमशंकर महाजन, मुख्याध्यापक शाहूराज जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श विद्यालयातील सहशिक्षक तथा मुरुमच्या यशवंत नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत सोमवंशी यांना नुकताच बहुजन हिताय मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वाघ यांच्या हस्ते सोमवंशी यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजक प्रज्ञाजीत, धम्मचारी धम्मभूषण उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सरचिटणीस बसवराज पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, संस्थेचे संचालक शिवमुर्ती भांडेकर गुरुजी, भाऊराव सोमवंशी, मल्लिनाथ दंडगे, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या सगर आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم