माधवराव पाटील महाविद्यालयात सामुदायिक अवयवदान प्रतिज्ञेचे आयोजन

माधवराव पाटील महाविद्यालयात सामुदायिक अवयवदान प्रतिज्ञेचे आयोजन 
 मुरुम- येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित अंगदान (अवयवदान) गुरुवारी (ता.३) रोजी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे होते. डॉ. महेश मोटे यांनी सन २००५ साली केलेल्या संपूर्ण देहदानाच्या संकल्पाचा आदर्श विद्यार्थ्यापुढे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मांडला. तसेच अवयवदानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना अवयवदानाचे सामुदायिक प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. रविंद्र आळंगे, प्रा. डॉ.अप्पाराव सूर्यवंशी, प्रा. डॉ. किरणसिंग राजपूत, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ, विलास खडके, डॉ. संध्या डांगे, डॉ. जयश्री सोमवंशी, प्रा. दिपाली स्वामी, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. राजनंदीनी लिमये, प्रा. योगेश पाटील, अमोल कटके, किशोर कारभारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. अशोक बावगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. शिला स्वामी यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

أحدث أقدم