संसार हा समूद्रा सारखा-ह.भ.प. रामायणचार्य विवेक महाराजऔसा-तालूक्यातील भादा येथे अधिक मास निमित्त अखंङ हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण तसेच श्री रामकथा सोहळ्याचे आयोजन गावातील हनूमान मंदिरात करण्यात आले आहे. हा सोहळा ता. 6ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत चालणार असून कथेच्या पहील्या दिवशी ह.भ.प.रामायणचार्य विवेक महाराज व्यास आळंदीकर यांनी भाविकांना संसार कसा आहे याबद्दल सांगीतले. संसार हा समूद्रा सारखा आहे. समूद्राच्या एका काठावर आपण जर उभा टाकलो तर दूसरा काठ आपणास दिसतो का तर दिसत नाही तसे आयुष्यात जन्म झालेला आपणास दिसतो पण मृत्यू दिसतो का दिसत नाही. समूद्रात भरपूर पाणी असते पण पिण्यासाठी वापरता येते का येत नाही. तसे मानवी आयुष्यात कितीही गरीबी किंवा श्रीमंती असली तरी तन आणी मन पिङामूळे भूक लागली असताना सूद्धा काही पदार्थ आपणास खाता येत नाहीत. असे साम्य संसार आणी समूद्रात आहे. असे महाराजांनी श्रोत्यांना सांगीतले. या सप्ताहात अन्नदाते म्हणून महादेव बाबूराव लूंगसे , अंगद पांडूरंग मोहीते , दौलत श्रीधर पाटील ,वृश्चिक राजाराम मोहीते, नामदेव हरीबा लाड , बबन विष्णू मगर ,सावता रामू घोङके , बिभीषण नारायण शिवलकर , दिलीप विनायक पाटील , चंद्रकांत शिवहारी कूंजीर , अंबादास नागोराव चांभारगे , कमलाकर नारायण शिवलकर , रणधीर तात्या पाटील , व अनिल नागनाथ माळी या भक्तांनी अन्नदान करण्याची सेवा स्विकारली आहे.
संसार हा समूद्रा सारखा-ह.भ.प. रामायणचार्य विवेक महाराज
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق