जवाहन नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ
लातूर : येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी सहावीत प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईटवर तणाव येत असल्याने पालकांनी ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर भरावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य मनोज कुमार जोशी यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रियाची सर्व माहिती https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज निशुल्क ऑनलाईन भरण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रथम नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाइटवरील प्रमाणपत्र डाउनलोड करून घेऊन इंटरनेटवर ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज https://cbseitms.rcil.
इयत्ता सहावीसाठी निवड चाचणी परीक्षेस बसणारा विद्यार्थी इयत्ता तिसरी, चौथीमध्ये सलगपणे उत्तीर्ण होऊन कोणताही खंड न पडता पाचवीमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये लातूर जिल्ह्यात शिकत असावा. त्याचा जन्म 1 मे, 2012 ते 31 जुलै, 2014 (दोन्ही दिवस पकडून ) दरम्यानचा असावा. त्याचे पालक लातूर जिल्ह्याचेच रहिवासी असावेत अन्यथा ते प्रवेश अर्ज भरण्यास अपात्र असतील. ही परीक्षा 20 जानेवारी, 2024 रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. इतर मागास (ओबीसी) प्रवर्गात अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च 2024 पूर्वी भारत सरकारचे इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी- फॉर्म नंबर.09 ) जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. एकदा अर्ज भरल्यानंतर त्यात बदल करता येत नसल्याने अर्ज भरताना परीक्षेचे माध्यम, वर्ग, शहरी/ग्रामीण, मुलगा/मुलगी, जन्म तारीख अचूक असल्याची खात्री केल्यानंतरच ऑनलाईन अर्ज जमा करावा .
आधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत लातूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रवेश परीक्षा प्रभारी बी डी. शेख (भ्रमणध्वनी क्र. 9817834930), व्ही. एच. खिल्लारे (भ्रमणध्वनी क्र. 9860568840) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य श्री. जोशी यांनी केले आहे.
إرسال تعليق