उस्मानाबाद नगर परिषदेअंतर्गत मलनि:सारण प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर - वसुधा फड
उस्मानाबाद: नगर परिषद मार्फत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत उस्मानाबाद शहर मलनि:सारण प्रकल्प (टप्पा-1) या योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. कामे झालेल्या शहरातील काही भागांमध्ये जमिनीचा काळ्या मातीचा स्तर (Soft Strata) असल्याने व सध्यस्थितीत पाऊस सुरु असल्याने अशा ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला होता. नगर परिषद मार्फत रस्ता मजबुतीकरणाची तसेच शहरात अनेक ठिकाणी आवश्यकतेनुसार मुरुम टाकण्याची कामे करण्यात येत आहेत आणि ती कामे लवकरात पूर्ण करुन रस्ते पूर्ववत करण्यात येतील, असे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी सांगितले आहे.
إرسال تعليق