हासेगाव लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. संग्राम देशमुख यांच्या शोध प्रकल्पास नांदेड विद्यापीठाकडून निधी मंजूर
औसा (प्रतिनिधी ) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव महाविद्यालयाचे एच ओ डी . (फार्मासु्टिकल केमिस्ट्री ) आणि सहाय्यक प्राध्यापक . संग्राम उमाकांत देशमुख यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत शैक्षणिक नियोजन विकास विभागाकडून डिजाईन अँड सिंथेसिस ऑफ हेटरोसायकलिक अनलॉग्स ऍज पोटेंशियल अँटी डायबिटीज एजेंट्स (मधुमेह रोग) या लघुशोध प्रकल्पास निधी मंजूर करण्यात आला आहे . त्यांच्या या प्रकल्प पूर्ती श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर आप्पा बावगे , संस्थेच्या ,उपाध्यक्षा सौ . जयदेवी बावगे , सचिव श्री वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे. प्राचार्या डॉ.श्यामलीला जेवळे ( बावगे) . लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर चे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी शुभेच्छा देत प्रा. संग्राम देशमुख यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
إرسال تعليق