प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे) यांना क्रिडा व युवा कल्याण मंत्री संजय बनसोडे हस्ते सन्मानित
औसा (प्रतिनिधी ) सलाम नारीं शक्तीला या उपक्रमांतर्गत कमी कालावधीत चांगली शैक्षणिक संस्था चालवत असल्याने श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव च्या प्राचार्या डॉ.श्यामलीला भिमाशंकर बावगे (जेवळे) यांना क्रीडा व युवा कल्याण मंत्री संजय बनसोडे हस्ते सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तीचा एकमतच्या वर्धापनदिनानिमित्त कृतज्ञाता सन्मानाने गौरव करण्यात येतो .
याप्रसंगी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे , संस्थेच्या ,उपाध्यक्षा सौ . जयदेवी बावगे , सचिव वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर चे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे) अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق