दयानंद कला महाविद्यालय फॅशन डिझाईन विभागातर्फे एक दिवसीय सेमिनारचे आयोजन

 दयानंद कला महाविद्यालय फॅशन डिझाईन विभागातर्फे एक दिवसीय सेमिनारचे आयोजन


            दि.२४ दयानंद कला महाविद्यालय फॅशन डिझाईन विभागाच्या वतीने विद्यार्थ्याकरिता एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारसाठी प्रमुख वक्त्या म्हणून आपल्याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी गौरी केला, औरंगाबाद यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी Brand Development करण्यासाठी आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना दिली. सेमिनारसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य प्रशांत मान्नीकर यांनी शुभेच्छा दिल्या.
या सेमिनारसाठी फॅशन विभागातील एकुण 110 विद्यार्थी उपस्थित होते.  या सेमिनार आयोजनाकरिता फॅशन विभाग प्रमुख श्रीमती सुवर्णा लवंद, श्रीमती पिपाडा एच.एस., श्रीमती देशमुख पी.के., श्रीमती निलावार डी.एस., श्रीमती बिराजदार पी.व्ही., कु. नाईक आर.जी., कु. अग्रे एम.ए., कु. कुलकर्णी बी.व्ही., कु. रंगदळ जी.एस., कु. पूजा मेडे, कु. देशमुख पी.एस., श्रीमती कोरे एस.के. इत्यादी प्राध्यापक तसेच सेवक नरसिंग लागले आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم