राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश सचिव सुलेमान (राजे) अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबिर
औसा/ प्रतिनिधी : - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान (राजे) अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दि. 06 ऑगस्ट 2023 रविवार रोजी किल्ला परिसरात या शिबिराचे उद्घाटन सुलेमान (राजे) अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आले असून या शिबिराचे आयोजन अफसर शेख युवा मंचच्या वतीने सकाळी 10 : 00 ते संध्याकाळी 06 : 00 वाजेपर्यंत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मा. नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान (राजे) अफसर शेख यांची उपस्थिती होते.
या शिबिरामध्ये परिसरातील वृद्ध, महिला, तरुण, नागरिकांनी या आरोग्य शिबिरात नाव नोंदणी करत तपासणी करण्यात येवून औषधोपचार गोळ्याचे वितरण करण्यात आले. या शिबिरात 3 शे हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. अत्याधुनिक मशीन यंत्राच्याद्वारे नेत्र तपासणी, दंत तपासणी, रक्त, रक्तदाब मधुमेह, शुगर, बीपी असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या पहिल्या दिवशी असंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असून शिबिरास उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. धावपळीच्या युगामध्ये आपल्या आरोग्याचे रक्षण व्हावे या उदात्त हेतूने जनतेच्या सेवेसाठी शहरात सुलेमान (राजे) अफसर शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीरे तीन दिवसीय विविध प्रभागांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच सध्या डोळ्यांची साथ चालू असल्याने डोळ्यांची नेत्र तपासणी करून घेणे गरजेचे ,तसेच नेत्र तपासणीनंतर चष्म्याचे नंबर घेऊन चष्मे घरापर्यंत वाटप करण्याचेही वाटप उपक्रम हाती घेतला आहे. या शिबिरास लातूर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे नेत्र तज्ञ डॉ.सावंत पवन, डॉ.इम्रान पठाण, दंत तज्ञ डॉ. पठाण जबीन, डॉ. नसीम पठाण, डॉ. वांडेकर यांनी सहकार्य केले. यावेळी माजी नगराध्यक्ष जावेद शेख, मेहराज शेख, अलीशेर कुरेशी, माजी नगराध्यक्षा सौ. किर्ती कांबळे, माजी पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, मुस्तफा (वकील) इनामदार, अविनाश टिके, विनायक सूर्यवंशी, अविनाश टिके, संगमेश्वर उटगे, उमर पंजेशा, रुपेश दुधनकर, राहुल मलवाड, अमर रड्डे, जुबेर शेख, मुन्ना देशमुख, रफिक मुंगळे, युसुफ पठाण, गजानन शिंदे, बसिद शेख, शकील मणियारी, यांच्यासह आदी उपस्थित होते.
إرسال تعليق