पं. शिवरुद्र स्वामी यांच्या भैरविणे पंडित भातखंडे संगीत समारोह संपन्न

पं. शिवरुद्र स्वामी यांच्या भैरविणे
पंडित भातखंडे संगीत समारोह संपन्न
औसा/प्रतिनिधी- येथील माऊली प्रतिष्ठान व माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने मुक्तेश्वर मंदिरात तीन दिवसीय भातखंडे संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.
      रविवारी राग शुद्ध कल्याण, राग मिया म्हलार मधील घन बरसात बुंद बुंद, सावरीयाने जादू डाला बाजू बंद खुलखुल जा या भैरविणे संगीत समारोहाची सांगता झाली.
       तीन दिवसांत अभिरुपा पैंजने यांनी राग पुरीया कल्याण, श्रुती बोरगावकर भीमपलासी, अविनाश यादव देशी भजन, चैतन्य पांचाळ शुद्ध सारंग, शिरीष बोकील मधूवंती, हरीश कुलकर्णी मुलतानी, सरस्वती बोरगावकर मधूवंती, पं. विठ्ठलराव जगताप भूप, कल्याणी जोशी बिलासखानि तोडी, प्राजक्ता काकतकर नट भैरव, मनोज सोळंके पखवाज सोलो, पं. किरण भावठाणकर चित्त मोहिनी, शिल्पा आठल्ये मधूवंती, मधूवंती बोरगावकर भीमपलासी, स्वरीत पांचाळ तबला सोलो, पं. मिलिंद चित्ताल अभोगी, कपिल जाधव सुंदरी वादन, डॉ. वृषाली देशमुख शुद्ध सारंग, पं. सुप्रतिक सेनगुप्ता सतार वादन, पं. विजय कोपरकर बसंत मुखारी, पं. अंगद गायकवाड गौड म्हलार, आणि, सारंग कुलकर्णी हार्मोनियम सोलो सादरीकरण केले.
      सर्व कलावंतांनी शास्त्रीय गायन आणि वादनाची कला सादर करून रसिकांना तीन दिवस मंत्रमुग्ध केले.
      गायकांना पं. पांडुरंग मुखडे, पं. बाबुराव बोरगावकर, तेजोवृष जोशी, बळवंत पांचाळ, जनार्धन गुडे, शशिकांत देशमुख, संजय सुवर्णकार, तेजस धुमाळ, रमाकांत पैंजने, मुकुंद मिरगे, अमरीश शिलवंत आणि शंकर जगताप यांनी साथसंगत केली.
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औसा नाथ संस्थानचे ह.भ.प.गहिनीनाथ महाराज, तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे अध्यक्ष पं. बाळासाहेब सूर्यवंशी, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, पं. राम बोरगावकर, धनंजय कोपरे, रवीअप्पा राचटे, रामगिरी महाराज, मंगळुरे आणि देवडीकर यांची उपस्थिती होती.
       निवेदक म्हणून प्रा. युवराज हलकुडे व हणमंत लोकरे यांनी केले तर व्यंकटराव राऊतराव यांनी आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم