रामनाथ विद्यालयात शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न
आलमला:श्री रामनाथ माध्यमिक विद्यालय आलमला येथे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री नागेश मापारी साहेब यांच्या सूचनेनुसार विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले, त्यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान विषयाशी निगडित आपले 45 प्रयोग उस्फूर्तपणे मांडले होते, शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला, शालेय जीवनापासूनच मुलांच्या मनात विज्ञान विषयक आवड निर्माण व्हावी म्हणून या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील व पर्यवेक्षकश्री पी.सी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक श्री शिरीष धाराशिवे, विज्ञान शिक्षिका सौ. दिपश्री उकरडे, श्री भास्कर सूर्यवंशी, सौ. निलंगेकर एस.एस. व श्री पंडगे एन. एन. यांचे मार्गदर्शन लाभले.
إرسال تعليق