भक्ती शक्ती मंगल कार्यालयात राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे आयोजन

भक्ती शक्ती मंगल कार्यालयात राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे आयोजन
लातूर/प्रतिनिधी : लातूर नेता न्युज चॅनेलच्या २ या वर्धापण दिनानिमित्त शहरात राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले असुन या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्यासह इतरही राज्यातील जवळपास ५०० पेक्षा जास्त सर्पमिञ येणार असुन त्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे संमेलन दि ६ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून दिवसभर चालणार आहे. या संमेलनात साप धरण्याची विकसित पद्धत, सर्पविज्ञान काल आज आणि उद्या, सर्पदंश प्रथमोपचार व उपचाराची पद्धती, साप वन्यजीव कायदे व सापांची वैज्ञानिक माहिती या विषयावर चर्चासत्र चालणार असुन या संमेलनात सर्पमित्रांच्या हिताचे ठराव घेऊन ते शासनाला सादर करण्यात येणार आहे.

सर्पमित्र हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक असला तरी तो उपेक्षीत आणि मागे आहे. ज्यांच्या घरी साप निघाला तेथे सर्पमित्र आपले खाजगी जीवन विसरून साप पकडण्यासाठी धावतो. सापच नव्हे तर इतर वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यावर वनविभागा ऐवजी सर्पमित्रांना बोलावले जाते. कोणतिही सुरक्षा नसताना सर्पमित्र आपला जिव धोक्यात घालून सेवा देत असतात. सर्पमित्र सेवा देत असताना दिवस रात्र बघत नाहीत पण याची दखल शासन स्तरावर घेतली जात नाही. त्यांच्या कामाची दखल शासन स्तरावर घेवून त्यांना शासनाने ओळख द्यावी. शासकिय स्वयंसेवक म्हणून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगर पालिका व महानगरपालिके अंतर्गत किमान मानधन, सुरक्षा साधने, आरोग्य विमा आणि अपघात विम्याची तरतुद करुन त्यासाठी निधी राखीव करावा अशा महत्वपूर्ण मागण्या या संमेलनातून जोर धरणार आहेत. या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्यासह परराज्यातूनही सर्पमित्र लातूरात दाखल होत आहेत त्याची सर्व व्यवस्था लावण्याचे काम सुरु असल्याचे आयोजन समितीच्या वतिने श्री नेताजी जाधव यांनी सांगितले आहे.

Post a Comment

أحدث أقدم