संगीतरत्न पुरस्काराने पं. शिवरुद्र स्वामी सन्मानित होणार

 संगीतरत्न पुरस्काराने पं. शिवरुद्र स्वामी सन्मानित होणार
औसा/ प्रतिनिधी-अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या वतीने दिला जाणारा पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्कार औसा येथील माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पं. शिवरुद्र स्वामी गुरुजी यांना जाहीर झाला आहे.
        संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या कलावंतांना हा पुरस्कार दिला जातो.पं. शिवरुद्र स्वामी गुरुजी यांनी संगीत क्षेत्रासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.
      पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने मराठी साहित्य संस्कृती मंदिर वाशी येथे शनिवार 19 ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारोपात हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
       पं. शिवरुद्र स्वामी गुरुजी यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सांगित क्षेत्रातील रसिकांनी, पत्रकारांनी, आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم